रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलतर्फे दि. ५ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.३० वा. कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे.
हे इंटरव्ह्यू पुणे स्कॉलर कट्टा प्रा. लि. या एज्युकेशन सॉफ्टवेअर आणि सोल्युशन्समध्ये काम करणाऱ्या कंपनीमार्फत महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि चिपळूण या कार्यक्षेत्रामध्ये भरावयाच्या पदांकरिता होणार आहेत.
तरी महाविद्यालयातून २०१९-२०, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले कोणत्याही शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी यामध्ये सहभागी होऊ शकतात. त्याचप्रमाणे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात पदवीच्या अंतिम परीक्षेला बसणारे विद्यार्थीही उपस्थित राहू शकतात.
तरी इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी दि. ५ मार्च रोजी डॉ.र. शं. केळकर सेमिनार हॉल, गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे कागदपत्रांसह उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी डॉ. रुपेश सावंत यांच्याशी संपर्क साधावा.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:05 AM 05-Mar-22