किरण तायडे यांचे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांचा दर्जा सुधारण्यासाठी लाक्षणिक उपोषण

0

खेड : तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांचा दर्जा सुधारावा यासाठी मानवाधिकार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत गुरुवारी दि. ३ रोजी खेड रेल्वेस्थानक नजीक वेरळ-शिव यामार्गाच्या बाजूला लाक्षणिक उपोषण केले.

HTML tutorial

मानवाधिकार असोसिएशन या सामाजिक संस्थेचे काम करणारे किरण तायडे यांनी गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांबाबत आंदोलनाचा पवित्र घेतला आहे.

दि. २६ जानेवारी रोजी या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी खेड तहसील कार्यालयाच्या आवारात लाक्षणिक उपोषण केले होते. त्यावेळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता यांनी त्यांना लेखी आश्वासन देऊन उपोषणापासून परावृत्त केले होते. मात्र, अधिकारी केवळ चालढकल करत असल्याचा आरोप करत श्री. तायडे यांच्यासह भोस्ते, कोंडीवली, शिव, अलसुरे येथील ग्रामस्थांनी या विषयाकडे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत खेड रेल्वेस्थानकानजीक लाक्षणिक केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:30 AM 05-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here