जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसने राज्यातही आपला फैलाव सुरू केला आहे. कारण आता पुण्यात दोन रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. या दोघांनाही नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या दोन्ही रुग्णांना करोना कक्षात देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान करोनाचे रुग्ण आढळल्याने शहरात चिंतेंचं वातावरण असून पूर्वकाळजी म्हणून आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सगळ्यांनी काळजी घ्या. या संपूर्ण परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
