कर्नाटकातील चोरटे सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून जेरबंद

0

सिंधुदुर्ग: चाकू सुऱ्याचा धाक दाखवून कर्नाटक राज्यातील यल्लापूर येथे जबरी चोरी करून पसार झालेल्या मध्यप्रदेश-धार येथील टोळीस सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ओरोस जिजामाता चौक येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीकडून २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या संशयित दोघांना यल्लापूर (कर्नाटक) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ४ मार्च रोजी मध्यप्रदेश-धार येथील सराईत गुन्हेगारांनी रात्री यल्लापूर येथील एका व्यक्तीला चाकू सुऱ्याचा धाक दाखवून रोख रक्कम १ लाख रुपये व सोन्याच्या दागिन्यांची लूटमार केली होती. तसेच चारचाकी घेऊन पसार झाले होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here