कोल्हापूर: करोनाच्या धास्तीने सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. कोल्हापूरमध्येही सध्या असंच काहीसं घडत आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी रोज १५ ते २० हजार भाविक कोल्हापुरात येतात. त्यामुळे मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने मंगळवारपासून भाविकांना हॅन्ड सॅनिटायझर लावले जात आहे. अंबाबाई मंदिराच्या चारही दरवाज्यांवर समितीच्या कर्मचाऱ्यांनी भाविकांच्या हाताला सॅनियाझर लावल्यानंतर त्यांना आत प्रवेश दिला जात आहे. परिसरात येणाऱ्या भाविकांना व नागरिकांना या व्हायरसची माहिती व्हावी यासाठी मोठा माहिती फलकही लावण्यात आला आहे. तसेच समितीने १ लाख माहितीपत्रक प्रसिद्ध केले आहेत.
