हातभट्टीच्या दारू प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथे वाटद परटवणे आणि किंजळेवाडी येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभटटीची दारू विक्रीसाठी जवळ बाळगल्याप्रकरणी दोघांविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार ६ मार्च रोजी करण्यात आली.

हरिश्चंद्र काशिनाथ किंजळे (५२, रा.वाटद किंजळेवाडी,रत्नागिरी) आणि रेवती चंद्रकांत रहाटे(४७,रा. वाटद परटवणे,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यातील किंजळे कडून ४७५ आणि रेवती रहाटेकडून ४२५ रुपये अशी एकूण ९०० रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली. अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:30 PM 08-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here