पुण्यात उद्या ‘मनसे’चा वर्धापनदिन

0

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींचा चांगलाच वेग प्राप्त झाला आहे. सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांचे दौरेही सुरु झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर जागा मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे.त्यानिमित्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नियोजनाला सुरुवात केली आहे. त्यातच उद्या, बुधवारी ९ मार्च रोजी मनसेचा वर्धापनदिन आहे. यंदा मनसेचा वर्धापनदिन पुण्यात साजरा होणार आहे. त्यामुळे आजपासून तीन दिवस राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असणार आहेत.

मार्चच्या नऊ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातून मनसेचा वर्धापनदिन जल्लोषात साजरा केला जातो. दरवर्षी अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत कार्यक्रम असतो. पण यंदा १६ वा वर्धापनदिन पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे साजरा होणार आहे. राज्यभरातून असंख्य मनसैनिक आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:58 PM 08-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here