उसाच्या फडाला लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्याचा मृत्यू

0

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या बाळासाहेब शामराव बलुगडे (वय ५८) यांचा उसाच्या फडाला लागलेल्या आगीमुळे होरपळून मृत्यू झाला. ही घटना तांबुळ नावाच्या शेतात घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने बिद्री साखर कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत संताप व्यक्त केलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात तुरंबे येथे बलुगडे यांचे दूधगंगा नदी जवळ ताबुळ नावाचे शेत आहे. आज मंगळवार सकाळी या शेतातील उसाच्या फडाला आग लागली. या आगीत सुमारे दहा एकरातील ऊस जळून खाक झाला. ही आग अत्यंत तीव्र होती. यावेळी उसाच्या फडाला लागलेली आग विझविण्यासाठी ग्रामस्थांसह बाळासाहेब बलुगडे या ठिकाणी गेले होते. आपल्या शेतातील फडाची आग विजवताना आगीच्या ज्वाळांनी ते होरपळले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here