“उत्सव स्त्रीत्वाचा” महिला दिन विशेष कार्यक्रम उत्साहात

0

रत्नागिरी : आम्ही सिद्ध लेखिका कोकण विभाग समूहाचा “उत्सव स्त्रीत्वाचा” हा महिला दिन विशेष कार्यक्रम मंगळवार दि. ८ रोजी उत्साहात साजरा झाला. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे प्रास्तविक आम्ही सिद्ध लेखिका रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष ऋतुजा कुळकर्णी यांनी केले. लता जोशी यांनी मला भेटलेली हिरकणी हा लेख, मनीषा पटवर्धन यांनी कविता, आकांक्षा भुर्के यांनी जोगवा व नाट्यछटा, उमा देवळे यांनी लेख, मधुरा नवेले यांनी स्त्रीला गौरवणारी कविता सादर केली. प्राजक्ता सरदेसाई यांनी कथा, ऋतुजा कुळकर्णी यांनी कविता तर सुनेत्रा जोशी यांनी कथा सादर केली.

स्त्री व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडणारे साहित्य विविध प्रकारातून सादर केल्या गेले. सगळ्यांचे सादरीकरण अतिशय उत्तम झाले. राधा देवळे, प्रिया महाडिक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. आम्ही सिद्ध लेखिका कोकण विभाग प्रमुख आणि जिल्हा अध्यक्षा सुनेत्रा जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना स्त्रियांनी आपल्या लिखाणातून समाजात एखादा सकारात्मक बदल घडावा असे लिखाण करावे. तसेच आम्ही सिद्ध लेखिकाने जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, त्या संधीचा फायदा घ्यावा असे सांगून आभार प्रदर्शन केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:24 AM 09-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here