कोरोनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तातडीची बैठक

0

राज्यात कोरोनाबाधीतांची संख्या पाचवर

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

राज्यात कोरोनाचे सावट दिसून येत आहे. राज्यात कोरोनाबाधीतांची संख्या पाचवर गेली आहे. तर मुंबईत सहा जणांना रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. सर्व कोरोना बाधितांवर उपचार सुरु करण्यात आलेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आयपीएलसह राज्यातील इतर महत्त्वाचे कार्यक्रम पुढे ढकलायचे का या संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्राथमिक, माध्यमिक शालांत परीक्षा लवकर घेऊन शाळांना लवकर सुट्टी देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच राज्य विधिमंडळाचे अधिवेशन लवकर गुंडाळण्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here