अखेर ज्योतिरादित्य सिंधिया यांचा भाजपात प्रवेश!

0

काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसचा हात सोडत पक्षातल्या आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. आज त्यांनी नवी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधिया यांनी भाजपचं उपरणं गळ्यात घातलं. दुसरीकडे या पक्षप्रवेशाला गृहमंत्री अमित शहा आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची अनुउपस्थिती आश्चर्यकारक होती. जे.पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजप राज्यसभेवर संधी देणार असल्याची शक्यता वर्तवली जातीये. तसंच त्यांना केंद्रिय मंत्रीपदाची देखील संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, सिंधिया यांचा भाजप प्रवेश हा निश्चित काँग्रेसला मोठा धक्का आहे. मी मोदी-शहा आणि नड्डा यांचा आभारी आहे की मला त्यांनी भाजपमध्ये येण्याचा निमंत्रण दिलं, असं सिंधिया म्हणाले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here