रत्नागिरी: मंगळवार दि. १०ला ना. उदय सामंत यांनी चिपळूण सांस्कृतिक केंद्रात सर्वपक्षीय नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. ‘स्वायत्त संस्था असलेल्या नगर परिषदेच्या अधिकारात मी कोणताही हस्तक्षेप न करता सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन एक महिन्यात करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, सर्वपक्षीय नगरसेवकांनी यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी. तसेच प्रशासनाने देखील सर्व कायदेशीर, तांत्रिक बाबींची पूर्तता महिन्याभरात करावी. तक्रारींबाबत चौकशी सुरू राहील. त्यासाठी केंद्राचे लोकार्पण थांबवू नका’, अशी सूचना उच्च व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथील बैठकीत केली. यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी केंद्राच्या कामाचा प्रशासनाकडून आढावा घेतला.
