रत्नागिरी येथील रुची लंच होमच्या संचालिका हर्षदा ताटके येत्या १५ मार्चपासून बंदर रोड येथील रुची लंच होम आणि आरोग्य मंदिर येथील न्यू रुची लंच होममध्ये खास मधुमेहींसाठी थाळी उपलब्ध करून देणार आहेत. या थाळीमध्ये वरीचा भात, उडीद डाळीचे वरण, ज्वारी-नाचणीची भाकरी, मोड आलेल्या कडधान्यांची उसळ, मोड आलेल्या मेथीचे लोणचे, खास चटणी आणि सॅलड असे पदार्थ असणार आहेत. अनेक वैद्यकीय व्यावसायिकांशी आणि आहारतज्ज्ञांशी हर्षदा ताटके आणि हनुमंत ताटके यांनी चर्चा करून थाळीतील पदार्थ आणि त्यातील घटकांचे प्रमाण निश्चित केले आहे. या थाळीची किंमत रुपये शंभर असेल. त्याचप्रमाणे मधुमेहींकरिता ऑर्डरनुसार हरिकाचा भात करून दिला जाणार आहे.
