झरेवाडी ग्रामपंचायतीच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा ना. उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न

0

जिल्हा वार्षिक योजना २०१८-१९ जनसुविधा अंतर्गत झरेवाडी ग्रामपंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन मंगळवारी ना. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. झरेवाडी ग्रामपंचायतीचा उपयोग जास्तीत जास्त विकासकामांसाठी होईल. गावाचा विकास साधण्यासाठी ग्रामस्थांनी एकमेकांमध्ये समन्वय साधून काम करणे गरजेचे आहे. झरेवाडी या गावाच्या विकासासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, तसेच झरेवाडी रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले. यावेळी बांधकाम व आरोग्य सभापती महेश ऊर्फ बाबू म्हाप, रत्नागिरीच्या पंचायत समिती सभापती प्राजक्ता पाटील, पंचायत समिती सदस्य विधी भाताडे, उत्तम सावंत, तहसीलदार शशिकांत जाधव, गटविकास अधिकारी जाधव, सरपंच चंद्रकांत गोताड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here