राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला तर देशातील राजकारणाला कलाटणी मिळेल – सुशीलकुमार शिंदे

0

गुहागर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे व कुटुंबासमवेत गुहागरमध्ये शिमगोत्सव पहाण्यासाठी आले आहेत. त्यावेळी त्यांनी कोकण, राजकारण अशा विविध मुद्यांवर भाष्य केले. ‘कोकणातील पर्यटनवाढीसाठी राज्य सरकारने सचिव, उपसचिव स्तरावर स्वतंत्र कमिटी स्थापन केली पाहिजे. या समितीने पायाभूत सुविधांसोबत काही स्थळे विकसित करण्याबाबतचा अभ्यास अहवाल तयार करावा, असे मत व्यक्त केले. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या अपेक्षांची पूर्ती करणे हे स्थानिकांचे काम आहे. तरीदेखील काही स्थळे निवडून त्यांच्या विकासासाठी शासनाने काम केले पाहिजे. गणपतीपुळे हे पर्यटनदृष्ट्या विकसीत करण्यात शासनाचा मोठा सहभाग आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला तर देशातील राजकारणाला कलाटणी मिळेल, असे राजकीय भाष्यही त्यांनी यावेळी केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here