मध्य प्रदेशचा वायरस महाराष्ट्रात घुसणार नाही; महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवला आहे – संजय राऊत

0

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचे परिणाम इतर राज्यांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यावर चिंता नसावी, महाराष्ट्राची ‘पाॅवर’ वेगळी आहे, मध्य प्रदेशचा वायरस महाराष्ट्रात घुसणार नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. य़ाबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. महाराष्ट्राची ‘पाॅवर’ वेगळी आहे. एक ऑपरेशन शंभर दिवसापूर्वी फसलं आहे. त्यानंतर महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवला. मध्य प्रदेशचा वायरस महाराष्ट्रात घुसणार नाही. चिंता नसावी, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गोवा, कर्नाटकात भाजपने कमळ ऑपरेशन राबवत आपली सत्ता आणली आहे. त्यानंतर त्यांनी मध्य प्रदेशमध्ये आपला मोर्चा वळवला आहे. त्यापुढील टार्गेट हे महाराष्ट्र आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिला आहे. विश्वासदर्शक ठराव होत नाही तोपर्यंत कमलनाथ सरकार पडले असं म्हणता येणार नाही. काँग्रेसअंतर्गत वादामुळे मध्य प्रदेशात हे घडत आहे. भाजपने त्याचे श्रेय घेवू नये. ज्योतिरादित्य सिंधिया यांना सांभाळायला हवं होते. तिथं काँग्रेस पक्षात मिस हँडलिंग झाले आहे. महाराष्ट्रात याचा कोणताही परिणाम होणार नाही, कुणाला गुदगुल्या होत असतील तर त्या अस्वलाच्या गुदगुल्या आहेत. अस्वलाची नखे लागतात आणि स्वतःच रक्तबंबाळ होतो. ऑपरेशन कमळ वगैरे काही नसते. १०० दिवसांपूर्वी ऑपरेशन कमळ करून ८० तासांचे सरकार बनवले होते. परंतु ते कसे फेल गेले आणि ऑपरेशन करणारे कसे दगावले याचे भान स्वप्न पाहणाऱ्यांनी ठेवावे. भाजप नेत्यांनी महाराष्ट्रात स्वप्न पाहू नये. अग्रलेख वाचत राहा, तो वाचण्यासाठी असतो चर्चेसाठी नसतो, असा जोरदार टोला राऊत यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here