कृषीपंप वीजजोडणी धोरण अंतर्गत कोकण विभागात 31 हजार 981 जोडण्या

0

रत्नागिरी : नवीन कृषीपंप वीजजोडणी धोरण अंतर्गत राज्यात आतापर्यंत 1 लाख 20 हजार 572 कृषिपंपांना नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये कोकण विभागात 31 हजार 891 वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
यामध्ये पुणे प्रादेशिक विभागात 57 हजार 70, कोकण- 31 हजार 891, नागपूर- 20 हजार 554 आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागात 11 हजार 57 कृषिपंपांना नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. तर कृषी आकस्मिक निधीमधून आतापर्यंत राज्यात 585 कोटी 79 लाख रुपये खर्चाच्या 23 हजार 778 वीज यंत्रणेच्या विविध कामांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. त्यातील 18 हजार 501 कामांचे कार्यादेश देण्यात आले असून, 15 हजार 725 कामे प्रगतीपथावर आहेत तर 2776 कामे पूर्ण झाली आहेत.

कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार कृषी वीजबिलांच्या चालू व थकित बिलांच्या भरण्यामधील 66 टक्के रकमेचा कृषी आकस्मिक निधी हा ग्रामपंचायत आणि जिल्हास्तरावर कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत 1741 कोटी 22 लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. यामध्ये प्रत्येकी 870 कोटी 61 लाख रुपयांची निधी हा ग्रामपंचायत व जिल्हाक्षेत्रातील वीजयंत्रणेच्या विकास कामांसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या, योग्य दाबाने व सुरळीत वीजपुरवठ्यासह स्थानिक वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाला वेग मिळाला आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील जागेच्या भौगिलिक परिस्थितीनुसार नवीन कृषिपंप वीज जोडणी ही सिंगल फेज, लघुदाब व उच्चदाब विद्युत प्रणालीवर देण्यात येत आहे. अस्तित्वात असलेले लघुदाब वीज ग्राहक वैकक्तिक किंवा वीज जोडणी समुहात उच्चदाब प्रणालीवर वीज जोडणी घेऊ शकतात. ज्या कृषीपंपाचे अंतर लघुदाब वाहिनीपासून 30 मीटरच्या आत व वितरण रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे अशा सर्व कृषीपंपास एक महिन्याचा आता वीज जोडणी देण्यात येत आहे. ज्या कृषीपंपाचे अंतर लघुदाब वाहिनीपासून 100 मीटरच्या आत व वितरण रोहित्रावर योग्य क्षमता उपलब्ध असलेल्या कृषी पंपास तीन महिन्याचा आता एरियल बंच केबलद्वारे वीज जोडणी दिली जात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:13 PM 10-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here