रोहिदास समाज सेवा संघातर्फे मंडणगड मध्ये संयुक्त जयंती महोत्सव

0

मंडणगड : मंडणगडमधील आदर्शनगर येथे रोहिदास समाज सेवा संघाच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.

जयंती उत्सवाची सुरुवात तालुका समन्वयक अरविंद नांदगावकर, तालुकाध्यक्ष आनंद सावर्डेकर, राजेंद्र आंबेकर यांच्या उपस्थितीत झाली. यानंतर दापोलीतील संदीप जालगावकर यांचे संत रोहिदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे सामाजिक कार्य एक चिकित्सा या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर मंडणगड नगराध्यक्ष सोनल बेर्डे व उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांचा समाजाच्या वतीने सत्कार केला. अध्यक्ष आनंद सावर्डेकर यांनी समाज मंदिरसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

मुकेश आंबेकर यांनी प्रास्ताविक केले. अरविंद नांदगावकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी तालुक्यातील समाजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here