फेडरेशन करंडक टेनिस स्पर्धेत भारतीय महिला टेनिसपटूंनी अलौकिक कामगिरी

0

 फेडरेशन करंडक टेनिस स्पर्धेत भारतीय महिला टेनिसपटूंनी अविश्‍वसनीय कामगिरी करत प्लेऑफ फेरीत स्थान मिळविले आहे. भारताची खेळाडू अंकिता रैना हिच्या दमदार खेळाच्या जोरावर भारताने इंडोनेशियाचा 2-1 असा पराभव केला. रुतुजा भोसलेला बिगरमानांकित प्रिस्का मॅडने नुगहोने 3-6, 6-0, 6-3 असे पराभूत केले व आघाडी घेतली. रैनाने अल्दिला सुतजिआवर 6-3, 6-3 असा सरळ दोन सेटमध्ये विजय नोंदविला व 1-1 अशी बरोबरी साधून दिली. भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झाने दुहेरीच्या सामन्यात अंकितासह खेळताना अल्दिला आणि प्रिस्का या जोडीचा 7-6 व 6-0 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले व स्वप्नवत प्लेऑफ फेरी गाठली.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here