प्रणिती शिंदेंना कॅबिनेट की राज्यमंत्रीपद ?

0

सोलापूर : कॉंग्रेसने 2009 पासून सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद दिले नाही. 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेसला त्याची मोठी किंमत मोजावी लागली. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद जिल्ह्यात वाढत असतानाच मोदी लाटेनंतर भाजपनेही चांगलाच जम बसविला आहे. त्यामुळे मित्रपक्ष व विरोधकांच्या तुलनेत आपली ताकद वाढण्यासाठी जिल्ह्याला मंत्रिपदाची गरज आहे. लोकसभेला दोनवेळा पराभव झाल्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेही राजकारणापासून अलिप्त होत आहेत. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदेंना मंत्रिपद दिल्यास शहर-जिल्ह्यातील कॉंग्रेसला निश्चितपणे बळ मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांना आहे.

शहर कॉंग्रेसने आमदार प्रणितींना मंत्रिपद द्यावे, असा ठराव करून तो पक्षश्रेष्ठीला पाठविला आहे. तर जिल्हा कॉंग्रेसनेही तसा ठराव केला आहे. पण, पक्षश्रेष्ठींकडून पुढे निश्चितपणे संधी मिळेल, असा विश्वास आमदार प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना बोलून दाखविला आणि पदाधिकारी गप्प बसले. आता महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीपूर्वी त्यांना मंत्रिपद मिळाल्यास निश्चितपणे कॉंग्रेसची ताकद वाढलेली दिसेल, अशी स्थिती आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे रविवारी (ता. 13) सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:58 PM 10-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here