कचरा टाकल्याच्या शुल्लक कारणावरून वृद्धाला सहाजणांकडून मारहाण

0

रत्नागिरी शहराजवळील आंबेशेत-बौद्धवाडी येथे जागेमध्ये कचरा टाकल्याच्या रागातून वृद्धाला सहाजणांनी मारहाण केली. संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय सखाराम सावंत, निखिल संजय सावंत, शुभम दिलीप सावंत, जगदीश चंद्रकांत सावंत, स्वप्नील संजय सावंत व स्नेहल दिलीप सावंत (रा. सर्व बौद्धवाडी- आंबेशेत) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना रविवारी (ता.८) दुपारी तीनच्या सुमारास घडली. शांताराम गोविंद सावंत (वय ६१, रा. बौद्धवाडी-आंबेशेत) यांनी घरातील व अंगणातील कचरा संशयित उभ्या करत असलेल्या दुचाकीच्या जागेत टाकला. या वेळी शाब्दिक चकमक उडाली होती. याचा राग आल्याने संजय सावंत याने दगडाने मारहाण केली. अन्य संशयितांनी हाताच्या ठोशाने मारहाण करून शिवीगाळ केली. या प्रकरणी शांताराम सावंत यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सकपाळ करत आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here