भाऊचा धक्का ते मांडवा या जलवाहतूक मार्गानं प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी आणि प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भाऊचा धक्का ते मांडवा अशी रो पॅक्स फेरी सेवा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांना आता केवळ ४५ मिनिटात मांडव्याला पोहोचता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फेरी सेवेच्या कामाचा आढावा घेतला. आज फेरीबोट सेवेची चाचणी घेण्यात आली.

