रत्नागिरी : घराच्या पाठीमागील बाथरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वैभव मधुकर दांडेकर (वय ३५, रा. वरचीआळी, शास्त्रीचाळ, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ९) रात्री दोनच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दांडेकर घराच्या पाठीमागील बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत पडले होते. तेथील नागरिकांनी पाहिल्यानंतर त्याला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
