शीर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर सहकार विकास पॅनलचे वर्चस्व

0

गुहागर : गुहागर तालुक्यातील शीर, मासू, चिंद्रावळे अशा तीन गावांची मिळून असलेल्या शीर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत विरोधकांची धूळवड करण्यात सहकार विकास पॅनेलला यश मिळाले आहे.

सर्वच सर्व १२ जागांवर उमेदवारांनी विजय मिळवित या संस्थेवर पुढील ५ वर्षे आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी उमेश भाटकर यांनी या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कामकाज पाहिले. त्यांनी विजयी उमेदवार जाहिर केले. सर्वसाधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधी मतदारसंघातून बलवंत लक्ष्मण ठोंबरे, नयन गजानन गुरव, शंकर गुणाजी आंबेकर, लक्ष्मण बाळकृष्ण आंबेकर, शंकर महादेव आंबेकर, शिवराम हरी आंबेकर, मनोज मोरेश्वर निमकर, मंगेश विश्राम मास्कर, राखीव अनु.जाती जमाती अनंत विठ्ठल पवार, राखीव इतर मागास वर्ग मधून विजय सोनू मसूरकर, राखीव महिला प्रतिनिधी सुमिता दत्ताराम मते, सविता चंद्रकांत सलपे हे उमेदवार निवडून आले.

या निवडणुकीला कोणताही राजकीय रंग नसला तरी सहकार विकास पॅनेलने गेली ३० वर्षे या संस्थेवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मासू, चिंद्रावळे व शीर या तीन गावांतील मतदार सभासदांनी या पॅनेलच्या विकासावर विश्वास ठेऊन त्यांना पुन्हा विजयी केले आहे, अशी प्रतिक्रिया सहकार विकास पॅनेलचे सर्वेसेवा अनंत पवार यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:37 PM 11-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here