सार्वजनिक आरोग्य विभागाकडील सर्व शासकीय रुग्णालयात सीसीटीव्हीची नजर

0

रत्नागिरी: सार्वजनिक आरोग्य विभागाकडील सर्व शासकीय रुग्णालयात सीसीटीव्हीचा प्रयोग करण्यात येणार असून राज्यातील ३९८ रुग्णालयात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी शासनाने ४ कोटी २ लाख रुपये मंजूर केले आहेत. काही महिन्यापूर्वी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात कॅमेरे बसविण्यात आले होते; मात्र जिल्हा रुग्णालयाचा सर्व परिसर त्यात येत नव्हता. नवीन इमारतीत ही यंत्रणा नाही. त्यामुळे, सीसीटीव्ही नव्याने बसविण्यात येणार आहेत. तसेच, कळंबणी, कामथे, दापोली उपजिल्हा रुग्णालयात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. तर, दुसऱ्या टप्प्यात सर्व ग्रामीण रुग्णालये असून त्यामध्ये राजापूर, लांजा, पाली, संगमेश्वर, देवरुख, गुहागर, रायपाटण, मंडणगड यांचा समावेश असेल.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here