गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे खगोलशास्त्र कार्यशाळेचे आयोजन

0

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे खगोलशास्त्र विषयातील कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळा महाविद्यालयात दि. २६ ते ३० मार्च २०२२ या कालावधीत रोज संध्याकाळी ४.३० ते रात्री ९ या वेळेत असेल.

खगोलविश्वाच्या रंजक गोष्टी उलगडून दाखविणाऱ्या या कार्यशाळेत ग्रह तारकांची माहिती, सौर दिनदर्शिका, पंचांगाचा आकाश निरीक्षणासाठी वापर, उघड्या डोळ्यांनी आकाश निरीक्षण, दुर्बिणीद्वारे आकाश दर्शन आदी विषयांचा अंतर्भाव असेल.

कार्यशाळेस मार्गदर्शन करण्यासाठी खगोलशास्त्र विषयातील अनुभवी तज्ज्ञ हेमंत मोने, आकाश मित्रमंडळ, कल्याण, प्रा. पद्मनाभ सरपोतदार, गुहागर उपलब्ध असतील. या कार्यशाळेत खगोलशास्त्राची आवड असणाऱ्या वा कुतूहल असणाऱ्या व्यक्ती सहभागी सहभागी होऊ शकतात. या कार्यशाळेसाठी रु.३०० प्रवेश शल्क आकारण्यात येणार आहे.

कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी डॉ. विवेक भिडे, प्रा. बाबासाहेब सुतार, प्रा. निशा केळकर, खगोल अभ्यासकेंद्र, भौतिकशास्त्र विभाग, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा.

कार्यशाळेसाठी नाव नोंदणी १९ मार्च २०२२ पर्यंत करता येईल. या कार्यशाळेसाठी मर्यादित जागा असल्याने इच्छुकांनी आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:05 AM 12-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here