जैतापूरातील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सचिन नारकर यांचा अपघाती मृत्यू हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांसह अनेकांनी व्यक्त केलेला असतानाही नारकर यांच्या या अपघातातील मृत्यूला चार ते पाच दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. आरोग्य विभागाकडून शवविच्छेदन अहवालानंतर नारकर यांचा व्हिसेरा अद्यपाही तपासणीसाठी पाठविण्यात आला नसल्याची बाब पुढे आली असुन पोलिसांनाही अद्यापही मोबाईल सीडीआर उपलब्ध न झाल्याने या तपासात दिरंगाई होत असल्याची बाबही पुढे आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी होत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी साळोखे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. तपास कामासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
