वाशिष्ठी नदीकिनारी आढळला तरुणाचा मृतदेह

0

चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीकिनारी २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आढळून आला. या घटनेची येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. राशीद इक्याल चौगुले (२२, रा. गोवळकोटरोड, चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे. राशीद हा ८ मार्च रोजी घरातून बाहेर पडला. मात्र, नेहमी प्रमाणे तो घरी आला नाही. यामुळे राशीदच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयन केला. दरम्यान, मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा चिपळूण रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या गांधारेश्वर पूल येथे वाशिष्ठी नदीकिनारी मृतदेह आढळून आला. या घटनेची येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास चिपळण पोलीस करीत आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here