काँग्रेस राजापूर विधानसभा अध्यक्षपदी नुईद काझी

0

राजापूर : काँग्रेसच्या राजापूर विधानसभा युवक अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत नुईद काझी हे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत.

युवक काँग्रेसच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीमध्ये राजापूर विधानसभा युवक अध्यक्षपदासाठी ऑनलाईन पध्दतीने झालेल्या मतदानामध्ये नुईद काझी यांना ३२३ मते मिळाली तर अनिकेत गांधी यांना १६१ मते मिळाली. त्यामुळे यामध्ये काझी यांची युवक अध्यक्षपदी निवड झाली आहे.

नुईद काझी हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असून तालुक्यात काँग्रेस संघटना वाढविण्यासाठी तरुणांना एकत्र करण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. सध्या सुरू असलेला पर्ससीन मच्छीमारांचा प्रश्न सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहे. मच्छीमारांच्या आंदोलनातही त्यांनी सहभाग घेत पाठींबा दर्शविला आहे. कोरोना महामारीच्या काळातही काझी यांनी चांगली कामगिरी करताना अनेकांना मदतीचा हात दिला होता.

विधानसभा अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. आपल्याला मिळालेल्या पदाला न्याय देताना विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी पाप्त करून देण्यासाठी आपण पयत्न करणार असल्याचे नुईद काझी यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:23 PM 12-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here