ऑन्को लाईफ केअरतर्फे कर्करोगाबाबत मार्गदर्शन

0

चिपळूण : ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त पोलिस अधीक्षक कार्यालयात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी डॉ. प्राची हरवंदे व डॉ. समरीन अत्तार यांनी महिला पोलिसांना कॅन्सरची लक्षणे व उपचार याविषयी मार्गदर्शन केले. स्तनाच्या कर्करोगाच्या तुलनेत गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. धुम्रपान, अस्वच्छता, मौखिक गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन केल्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग होतो. मात्र सकारात्मक दृष्टिकोन आणि नियमित तपासणीने गर्भाशयाच्या कर्करोगाला दूर ठेवता येऊ शकतो असे मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, सरकारी अभियोक्ता श्रीमती तीवरेकर आणि श्रीमती नलावडे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी श्रीमती वीर.. अनघा घाग, अॅड. प्रिया लोवलेकर आदींची उपस्थिती होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:49 PM 12-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here