सकारात्मक दृष्टिकोन अंगी बाळगून परीक्षेत उज्वल यश संपादन करा : विस्तार अधिकारी सशाली मोहिते

0

जाकादेवी (वार्ताहर) : इ.१२ वी बोर्ड परीक्षा सुरळीत सुरू झाली आहे. येत्या १५ मार्च पासून इ. १० वी ची बोर्ड परीक्षा सुरू होत आहे. इयत्ता दहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षा विद्यार्थी जीवनातील अतिशय महत्त्वाच्या असून जीवनाला कलाटणी देणाऱ्या आहेत. त्यामुळे येत्या १५ मार्च पासून सुरु होणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन अंगी बाळगून परीक्षेला सामोरे जा आणि उज्वल यश संपादन करा, अशा शुभेच्छा खालगाव बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ. सशाली मोहिते यांनी जाकादेवी हायस्कूल मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केल्या.

पुढे बोलताना सौ. सशाली मोहिते म्हणाल्या की, स्पर्धेच्या युगात अभ्यासाशिवाय पर्याय नाही.आवडीने नि जिद्दीने अभ्यास करा.अभ्यासाचा ताण घेऊ नका.अभ्यास एक छंद म्हणून जपा. अजूनही कोरोना संसर्गाचा प्रसार पूर्णतः थांबलेला नाही, त्यामुळे मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे त्या बोलल्या. एस.टी.फेऱ्या अभावी अनेक विद्यार्थ्यांना दूरहून पायपीट करावी लागत आहे. अनेक विद्यार्थी लांबून येणारे मी पाहिले आहेत.कष्टाशिवाय फळ नाही हा विचार स्मरणात ठेवून प्रत्येकाने ध्येयाने प्रेरित होऊन परिश्रमाने अपेक्षित ध्येय साध्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जाकादेवी‌ प्रशालेला सदिच्छा भेट देऊन त्यांनी इ. १० वी तील विद्यार्थ्यांशी संवाद साधून बहुमोल मार्गदर्शन केले. चित्रकला स्पर्धा परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे सौ.मोहिते यांनी अभिनंदन केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:11 PM 12-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here