पावस येथे थेट शेतमाल विक्री केंद्र सुरू

0

पावस : गोळप येथील एकलव्य शेतकरी गट यांनी जिल्हा कृषी अधीक्षक रत्नागिरी यांच्या आवारात थेट शेतमाल विक्री केंद्र सुरू केले आहे. यात केळी, फणस, हापूस आंबा, लाल भात, तळलेले गरे, हळद, काजू, ओले काजू, चिंच, कनगर, काळीमिरी, नाचणी पीठ, कुळीथ पीठ, भाजीपाला आदी वस्तू माफक दरात विक्रीसाठी ठेवल्या आहेत. शेतमालासाठी सेंद्रिय खत व औषधांचा वापर केला गेला आहे. या वस्तू स्वतः शेतकरी गट विक्री करत असल्यामुळे स्वस्त दरात या वस्तू ग्राहकांना मिळणार आहेत. तरी या विक्री केंद्राचा लाभ सर्वांनी घ्यावा. ६ मार्चला या केंद्राचे उद्घाटन जिल्हा कृषी अधीक्षक घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, मंडळ कृषी अधिकारी मनीषा जाधव, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हर्षला पाटील, कृषी सहाय्यक धनाजी पौळ व या शेतकरी गटाचे प्रमुख दत्ताराम वारीशे, श्रीकांत पैकडे, विलास गोरीवले आदी उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here