➡ चौथ्या जागेसाठी अजूनही तिढा कायम
राज्यसभेसाठी शरद पवार यांनी आज अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच काँग्रेसचे अन्य जेष्ठ नेतेही उपस्थित होते. जरी शरद पवारांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला असला तरी महाविकास आघाडीमध्ये चौथ्या जागेसाठी असलेला तिढा अजूनही सुटलेला नाही. राष्ट्रवादीकडून आज शरद पवार आणि फौजिया खान अर्ज दाखल करतील, असं सांगण्यात येत होतं. पण चौथ्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असल्यामुळे राष्ट्रवादीकडून आज शरद पवारांचाच अर्ज भरण्यात आला. महाराष्ट्रातून राज्यसभेवर सात उमेदवार जाणार आहेत. यासाठी 13 मार्च रोजी निवडणूका होणार आहेत.
