“बँकेत चार रुपये देखील नाहीत”, महिला कर्मचाऱ्याच्या बेजाबदार उत्तराने व्यापारी धास्तावला

0

रत्नागिरी : पाचशे रुपयांच्या नोटा देऊन त्याबदल्यात दहा रुपयांच्या नोटा मागणाऱ्या एका व्यपाऱ्याला बँकेतील महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या उत्तराने धक्काच बसला. हि घटना रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत घडली. ‘म्याडम माझ्याकडे चार हजार रुपये असून मला या बदल्यात दहा रुपयांच्या नोटा पहीजेत…नव्या जुन्या कशाही चालतील’ व्यपाऱ्याच्या या विनंतीला बँकेतील महिला कर्मचाऱ्याने दिलेले उत्तर अत्यंत धक्कादायक होते. महिला कर्मचारी म्हणाली “अहो चार हजार काय पण चार रुपये सुद्धा तुम्हाला द्यायला नाहीत” या उत्तराने व्यापारी धास्तावला व त्याने थेट शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र हे चुकीचे आहे, सुट्टे पैसे खूप आहेत, त्यांनी देणे हे त्यांचे काम आहे, देत नसतील तर तसे लिहून मागा असा सल्ला या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला. हि बाब खूप गंभीर असून याबाबत आपण लक्ष घालावे अशी विनंती करताच तो वरिष्ठ अधिकारी थेट एक्सेंज काउंटर ला गेला व त्याने पैसे बदलून देण्यास सांगितले.
देशातील काही बँका अडचणीत असताना ग्राहकांच्या दृष्टीने सुरक्षित बँक म्हणून स्टेट बँकेकडे पहिले जाते. ग्राहकांशी उद्धटपणे बोलण्यात व प्रत्येक गोष्टीत असहकार नोंदवण्यात हातखंडा असणारे देखील काही कर्मचारी या बँकेत आहेत. पर्याय नाही म्हणून आम्ही या बँकेत जातो असे देखील काही ग्राहकांनी सांगितले. बँकेतील काही उद्धट कर्मचाऱ्यांमुळे या बँकेचा लौकिक आहे. त्याचाच प्रत्यय आज एका रत्नागिरीतील व्यपाऱ्याला आला. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हा प्रकार गेला आहे. सुट्टे पैसे नागरिकांना मिळण्यासाठी स्टेट बँक हे माध्यम आहे. अनेक नागरिक यासाठी या बँकेत जातात. प्रकरण आपल्या अंगाशी येणार याची जाणीव झाल्यावर मात्र आम्हाला आरबीआय कडूनच सुट्टे पैसे येत नसल्याचे कारण या महिला अधिकाऱ्याने शेवटी दिले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here