पोषण आहार पंधरवड्याला सुरुवात

0

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वांत मोठा होळीचा सण सुरू असला, तरी पोषण आहार पंधरवडाही साजरा केला जात आहे. गेल्या ८ मार्च सुरू झालेल्या या पंधरवड्यात दररोज विविध उपक्रम पार पडत आहेत. आज पोषण आहार स्पर्धा पार पडली.
महिला आणि बालकल्याण विभागाने अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने घेतला असून त्याअनुषंगाने ८ ते २२ मार्च या दरम्यान राज्यभरात पोषण पंधरवडा राबविण्यात येत आहे. बालकांना पूरक पोषण आहार देणे, रक्तक्षय, कुपोषणमुक्तीसह आरोग्यविषयक धडे देण्यासाठी राज्यातील ग्रामपंचायती आणि अंगणवाडी केंद्रांवर जनजागृती सुरू आहे. बदलती जीवनशैली, वातावरणातील बदल, पोषण आहारासंदर्भात अचूक माहितीचा अभाव इत्यादी विविध कारणांमुळे बालकांमध्ये रक्तक्षय, कुपोषण आणि अन्य आजार जडत आहेत. त्यात बदल घडवून आणण्यासाठई अंगणवाडी केंद्रातील बालकांच्या आरोग्याबाबत जागृतीचे कार्यक्रम आखण्यात आले आहेत. त्याचा नियोजनबद्ध कार्यक्रमही जिल्हास्तरीय यंत्रणा राबवत आहे. महिला दिनी ८ मार्च रोजी पोषण पंधरवडा अभियानाचे प्रकल्पस्तर, ग्रामपंचायत आणि अंगणवाडी केंद्र स्तरावर उद्घाटन आणि महिला मेळावा झाला. त्यानतंर गावस्तरावर लहान बाळांना पूरक आहार देणे, कुपोषणमुक्तीबाबत पालकांचे कर्तव्य याबाबत पालक मेळावा पार पडला. दि. १० ला गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर पोषण फेरी काढण्यात आली. काल रक्तक्षय तपासणी शिबिर आणि बालकांच्या पालकांसाठी पोषण आहार स्पर्धा घेण्यात आली. आज (दि. १२ मार्च), हात धुण्याचे प्रात्यक्षिक आणि स्वच्छतेचे महत्त्व, त्यानंतर गृहभेटीद्वारे आरोग्यविषयक जनजागृती, बालकांना लोहयुक्त गोळ्यांचे वाटप इत्यादी कार्यक्रम २२ मार्चपर्यंत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here