रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघामार्फत चालवण्यात येणाऱ्या ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्गाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्गाच्या प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ग्रंथालयात कार्यरत असलेल्या सेवकांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येतो. दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय संघामार्फत करण्यात आले आहे.
या वर्गात प्रवेस घेऊ इच्छिणाऱ्यांनी ग्रंथपाल स्व. सौ. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय, ग्रंथस्नेह वितरण, सी-३१, शंखेश्वर गार्डन, गीता भवनसमोर, रत्नागिरी येथे सौ. कविता साबणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:03 PM 14-Mar-22