भाजपकडून राज्यसभा निवडणुक उमेदवारीला उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांच्या नावावर शिक्कामोर्तप

0

राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज काल बुधवारी दाखल केला. मात्र काँग्रेस चौथ्या जागेसाठी अजूनही आग्रही असल्यामुळे राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवार फौजिया खान तूर्तास ‘वेट अँड वॉच’ या भूमिकेत आहेत. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये सर्व तर्कवितकांना पूर्णविराम देताना भाजपाने महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि सहयोगी पक्ष असलेल्या आरपीआय (ए) चे नेते रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here