राष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेसाठी ‘गोगटे’च्या चिन्मय प्रभूची निवड

0

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या चिन्मय प्रभू यांची मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्तरावरीलअन्वेषण संशोधन स्पर्धेसाठीच्या संघात निवड झाली आहे.

प्रा. सी. ए. अजिंक्य, राजीव पिलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एस. टी. महामंडळाचे पुनरुत्थान, पुनरुज्जीवन करण्यासाठीचे सूचक मॉडेल’ या विषयावर त्याने प्रकल्प सादर केला होता. प्रतिवर्षी राष्ट्रीय स्तरावरील अन्वेषण संशोधन स्पर्धा घेतली जाते. त्यात देशातील सर्व विद्यापीठे सहभागी होतात. या स्पर्धेकरिता संघ निवडताना मुंबई विद्यापीठ त्यांच्याशी संलग्न असलेल्या सुमारे ७८१ महाविद्यालयांमधून संशोधन प्रकल्प निवडते. यावर्षी सर्व महाविद्यालयातून केवळ ५ संशोधन प्रकल्प स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवडले गेले. त्यात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा प्रकल्प समाविष्ट आहे. राष्ट्रीय स्तरावर संशोधन स्पर्धेत सहभागी होण्याची महविद्यालयाची ही दुसरी वेळ आहे.

या प्रकल्पात महाराष्ट्र एसटी महामंडळाची २०११ पासून २०२० पर्यंतची वित्तीय पत्रकांवरून विविध गुणोत्तरे आणि त्यांच्या महत्त्वाच्या आर्थिक निकषांचा कल अभ्यासला आहे. त्यावरून तोट्यात चालणाऱ्या एसटीचे पुनरुत्थान, पुनरुज्जीवन करण्याचे मॉडेल तयार करण्यात आले आहे. एसटीला तोटा होण्याची कारणे अभ्यासली आहेत आणि त्यावरून त्यांचा लोड फॅक्टर म्हणजे प्रतिबस प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी कोणते उपाय करता येतील, हे दाखवले आहे.

प्रतिकिलोमीटर उत्पन्न वाढवण्यासाठी, एकूण खर्च कमी करण्यासाठी आणि एसटीसाठी उत्पन्नाच्या नव्या संधी कोणत्या असतील, ते दाखवले आहे. भारतात ३७ एसटी महामंडळापैकी उत्तर प्रदेश आणि पंजाबचे महामंडळ नफ्यात आहे. बाकी सर्व महामंडळे तोट्यात आहेत. त्यामुळे रत्नागिरीत तयार झालेल्या मॉडेलचा उपयोग त्यांनाही होऊ शकेल.स्पर्धेसाठी प्रभू याला प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. एम. आर. साखळकर, वाणिज्य विद्याशाखा प्रमुख डॉ. यास्मिन आवटे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सोनाली कदम आणि संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. मयूर देसाई यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:07 PM 14-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here