कळझोंडी येथील बीएसएनएल टॉवरमध्ये बिघाड झाल्याने कळझोंडी गावाचा संपर्क तुटला

0

◼️ टॉवर दुरुस्तीची आग्रही मागणी

जाकादेवी/वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी येथे कार्यान्वित असलेल्या बीएसएनएल टॉवरमध्ये बिघाड झाल्याने गेले दोन दिवस या गावाचा अन्य गावाशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय झाली आहे.

कळझोंडी बौद्धवाडी नजीक उभारलेल्या बीएसएनएल टॉवर गेले दोन दिवस नादुरुस्त आहे. केबलच्या त्रुटीमुळे हा नादुरुस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. कळझोंडी गावातील शेकडो मोबाईल धारकांना या बंद टॉवरचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. गावात एकमेव असलेला टॉवर बंद पडल्यामुळे अनेकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाची गरज ओळखून बीएसएनएल अधिकाऱ्यांनी व कर्मचारी यांनी कळझोंडी येथील टॉवरकडे तातडीने लक्ष घालून उद्भवलेला बिघाड लवकरात लवकर दूर करावा, अशी आग्रही मागणी कळझोंडीतील सामाजिक कार्यकर्ते मेघना पाष्टे, संदीप पवार, किशोर पवार, महादेव आग्रे यांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:22 PM 14-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here