रत्नागिरीकरांच्या सुख-समृद्धीसाठी ना. उदय सामंतांचे भैरीबुवाला साकडे

0

रत्नागिरी शहराचे ग्रामदैवत श्रीदेव कालभैरवाचा शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले व रत्नागिरीकरांच्या आयुष्यात सुख-शांती, वैभव प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना केली. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भैरीचा शिमगोत्सव समस्त रत्नागिरीकर आणि बारा वाडीतील ग्रामस्थ अत्यंत भक्ती भावाने मोठ्या उत्साहात साजरा करतात. ना. उदय सामंत यांचीही भैरी बुवावर नितांत श्रद्धा असून, कोणतेही काम भैरी बुवांचे आशीर्वाद घेऊन करायचे हा त्यांचा नित्यक्रम, माझ्या शिरावर भैरी बुवांचा वरदहस्त असल्यानेच मी आज यशस्वी होऊ शकलो असे, ना. सामंत यांनी श्रीदेव भैरीच्या दर्शनानंतर सांगितले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे आणि सर्व ट्रस्टी तसेच इतर भक्तगण उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here