जनता सहकारी नागरी पतसंस्थेला बँको ब्लू रिबन पुरस्कार

0

रत्नागिरी : जनता सहकारी नागरी पतसंस्थेला सलग सहावा 2021 बँको ब्लू रिबन पुरस्कार वितरण सोहळा लोणावळा येथे संपन्न झाला.

महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रात बळकटी आणणाऱ्या पतसंस्थांना त्यांच्या कार्याची नोंद घेत अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा पुणे यांचे तर्फे देण्यात येतो. सन २०२१ चा सलग सहावा राज्यस्तरीय बँको ब्लू रिबन पुरस्कार कॉसमॉस बँक उपाध्यक्ष प्रल्हाद कोकरे यांचे हस्ते संस्थेचे चेअरमन राजेश लांजेकर, संचालक विष्णु लांजेकर, प्रकाश पाध्ये यांनी स्वीकारला.

संस्थेला मिळालेला बँको ब्लू रिबन पुरस्कारहा 15 कोटी ते 20 कोटी ठेवीच्या गटातून उत्तम गुण क्रमांकानुसार प्राप्त झाला आहे. सदरच्या पुरस्कारात संस्थेचे सर्व सभासद कर्जदार ठेवीदार व हितचिंतक यांचा मोलाचा वाटा आहे. सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व संचालक व कर्मचारी पिग्मी एजंट यांचे लांजा शहरातून कौतुक केले जात आहे. ग्राहकांचा विश्वास व कर्मचाऱ्यांची मेहनत याची पोच पावती आहे, असे मत चेअरमन राजेश लांजेकर यांनी व्यक्त केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:14 AM 15-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here