लग्नाचे आमिष दाखवत महिलेचे दागिने घेऊन फरार झालेल्या प्रियकराला पोलीस कोठडी

0

रत्नागिरी : लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे दागिने घेउन सव्वा दोन वर्ष फरार झालेल्या संशयिताला सोमवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ही घटना 6 नोव्हेंबर 2019 रोजी कोकणनगर येथे घडली होती.

मुश्ताक इसा काझी (57,रा.अजमेरीनगर,रत्नागिरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पिडीतेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानूसार, 17 ऑक्टोबर 2019 रोजी तीची मुश्ताकशी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर त्यांनी लग्न करण्याचे ठरवले.

दरम्यान, पिडीतेने तिचे दागिने मुथ्थुट फायनान्समध्ये गहाण ठेवले होते. ते सोडवण्यासाठी पिडीतेच्या आईने 4 नोव्हेंबर 2019 रोजी 2 लाख 50 हजार रुपये कोकणनगर येथे पिडीता रहात असलेल्या ठिकाणी आणून दिले होते. त्यानंतर दोघांनी मुथ्थुट फायनान्समध्ये जाउन गहाण ठवलेले दागिने सोडवून आणले होते. 6 नोव्हेंबर 2019 रोजी ते दागिने स्वच्छ करुन घेण्याच्या बहाण्याने मुश्ताक घेउन गेला तो परतलाच नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पिडीतेने 16 नोव्हेंबर 2019 रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी तपास करताना शहर पोलिसांनी मुश्ताकला अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:32 AM 15-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here