मनोरुग्ण तरुणीवर अत्याचारप्रकरणी होणार डिएनए तपासणी – जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे

0

रत्नागिरीच्या शासकीय मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या मनोरुग्ण तरुणीवर अत्याचार झाल्याप्रकरणी रत्नागिरी पोलीस स्थानकात अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यामध्ये पोलिसांकडून वैद्यकीय तज्ञांची मदत घेतली जाणार असून डिएनएद्वारे तपासणी केली जाणार आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल असलेली सोळा वर्षीय मुलगी गरोदर असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले होते. याबाबत माहिती देताना जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की, जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत ही युवती प्रादेशिक मनोरूग्णालयात उपचारासाठी दाखल होती. त्यानंतर तिला लांजा येथील महिलाश्रमात ठेवण्यात आले होते. मात्र तिथून ही युवती ७ जानेवारी रोजी एका मुलीसह पळून गेली होती. तिला १४ जानेवारी रोजी सांगली येथून पकडून आणले होते. या दरम्यान तिने तेथील एका मुलासोबत लग्न केले होते. याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर काही दिवसांनी ती पाच आठवड्यांची गरोदर असल्याचे तपासात पुढे आले होते. यावेळी या युवतीने प्रादेशिक मनोरूग्णालयातील एका शिपायाने हे अत्याचार केल्याचे सांगितल्याने संशयाची सुई आता प्रादेशिक मनोरूग्णालयाकडे वळाली आहे. परंतु याबाबत पोलीस अत्यंत जागरूकपणे या प्रकरणाचा तपास करणार असून यासाठी वैद्यकीय तज्ञांचीही मदत घेतली जाणार आहे. हे प्रकरण अत्यंत किचकट असून योग्य ती खबरदारी घेऊन तपास केला जाणार आहे त्यांनी स्पष्ट केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here