ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक : जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील

0

रत्नागिरी : सध्या अनेक नागरिक ऑनलाईन पध्दतीने व्यवहार करतात. आता मोबाईलद्वारे ऑनलाईन व्यवहार ही प्रक्रिया सोयीची व तात्काळ झाली आहे, परंतु यावेळी नागरिकांनी सावधनता बाळगणे फार आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन शुभांगी साठे, सहायक पुरवठा अधिकारी श्री. जाधव, नायब तहसिलदार श्रुती सावंत, भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक ॲङ आशिष बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी  श्री. पाटील म्हणाले, सध्या कॅशलेस व्यवहारांमुळे चलनाचा वापर कमी प्रमाणात होत आहे यामुळे सरकारचा चलन छपाईसाठी होणारा खर्चही कमी होत आहे.  केंद्र सरकार डिजीटल इंडिया कार्यक्रम राबवित आहे यामध्ये ऑनलाईन पध्दतीने व्यवहार करण्यासाठी डिजीटल माध्यमांचा विकास होत आहे.

कार्यक्रमाचे वक्ते ॲङ आशिष बर्वे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले, ऑनलाईन पध्दतीने व्यवहार किंवा खरेदी फसवणूक करणाऱ्या लिंकद्वारे करु नये. अनेक वेळा चुकीच्या लिंकद्वारे आपल्या खात्यातील रक्कम काढली जाते.  त्यामुळे अनोळखी लिंकचा वापर करु नये तसेच नागरिकांनी आपला पासवर्ड अथवा ओटीपी याची माहिती सुरक्षित ठेवावी. ऑनलाईन व्यवहार करताना किंवा व्यवहारात कार्डचा वापर करताना पासवर्ड काही कालावधीनंतर बदलणे फार आवश्यक आहे. यावेळी ॲङ आशिष बर्वे यांनी ऑनलाईन पध्दतीने फसवणूक झाल्यास सायबर क्राईम हेल्पलाईन क्र. 155260 येथे तक्रार नोंदवावी असे सांगितले.     

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी सांगितले डिजीटल पेमेंट हा नागरिकांच्या दैनंदिन व्यवहाराचा भाग झाला आहे.  मोबाईलद्वारे पेमेंट करता येणे शक्य असल्याने अनेक नागरिक याचा वापर करतात.  हे सर्व व्यवहार करताना नागरिकांनी सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.  

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:17 PM 15-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here