मुंबईच्या वडाळा रस्त्याला खेड पोयणार मधील महाडिक यांचे नाव

0

खेड : खेड तालुक्यातील पोयणार गावचे रहिवाशी कै रघुनाथ सखाराम महाडिक यांचे भारतीय क्रीडा मंदिर ते वडाळा बेस्ट वसाहत या रस्त्याला नाव देण्यात आले आहे याचे नाम फलक लोकार्पण नुकतेच पार पडले.

प्रभाग क्र. १८४ (पूर्वीचा १७८) चे ल नगरसेवक श्री. अमेय अरुण घोले यांच्या अथक प्रयत्नांमुळे भारतीय क्रीडा मंदिर ते वडाळा बेस्ट वसाहत या रस्त्याला स्व. रघुनाथ सखाराम महाडिक यांचे नाव देण्यात आले. नामफलकाचे उद्घाटन श्री. अमेय अरुण घोले, माजी नगरसेवक श्री सुनील मोरे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी सर्व महाडिक कुटुंबीय, महाडिक यांचे जुने सहकारी, रस्त्याला देण्यात आलेले नाव म्हणजे महाडिक यांनी आयुष्यभर केलेल्या मेहनतीचे व समाजकारणाचा एक प्रकारे शासनामार्फत झालेला गौरव च असल्याची प्रतिक्रिया महाडिक कुटुंबियांनी व्यक्त केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:10 PM 15-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here