जिल्ह्यात कोरोनाचे 7 ॲक्टिव्ह रुग्ण

0

रत्नागिरी : बुधवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 499 तपासण्यांमध्ये केवळ 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ 7 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

नव्याने एकही रुग्ण कोरोनामुक्त झालेला नाही. आत्तापर्यंत 81 हजार 922 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 96.99 टक्के आहे. नव्याने 2 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 465 झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 534 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 6 तर संस्थात्मक विलगीकरणात 1 रुग्ण उपचार घेत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:21 AM 17-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here