शरद पवारांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना मुंबईत तातडीचं बोलावणं

0

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये महाविकासआघाडी आणि भाजपमधील संघर्ष शिगेला पोहोचला असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना मुंबईत पाचारण केले आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बै

ठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संवाद साधणार आहेत. सध्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप आणि महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये दररोज कलगीतुरा रंगताना दिसत आहे. भाजपचे नेते सातत्याने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीही नवाब मलिका यांचा राजीनामा न घेण्यावर ठाम आहे. आगामी काळात भाजपकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी रेटा आणखी वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे शरद पवार आजच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोणता कानमंत्र देणार किंवा पक्षाकडून कोणती नवी रणनीती निश्चित केली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी संजय पांडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात निरनिराळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकनाथ शिंदे आणि नार्वेकर यांनी पोलीस आयुक्तांच्या घेतलेल्या भेटीमागे कोणते नियोजन असावे? आगामी काळात भाजपच्या आणखी एका नेत्यावर कारवाई किंवा गुन्हा दाखल होणार होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:35 PM 17-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here