रत्नागिरी जिल्ह्यात शेतमाल तारण कर्ज योजनेची प्रभावी अंमलबजावणी

0

◼️ शेतकऱ्यांना मिळतंय सहा टक्के व्याजदराने कर्ज

रत्नागिरी : शेतमालाच्या भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल न विकता ‘शेतमाल तारण कर्ज योजनेत’ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यात ठेवावा व त्या दिवसाच्या बाजारभावाच्या कमाल ७५ टक्के तारण कर्ज सहा महिन्यांकरिता सहा टक्के वार्षिक व्याजदराने घ्यावे असे आवाहन जिल्हा उप निबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी व जास्तीतजास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होण्यासाठी जिल्हा उप निबंधक डॉ. सोपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबीर घेऊन या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.

शेतमालाच्या काढणी हंगामात बाजारात अचानक मोठी शेतमालाची आवक होऊन मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन बिघडल्याने दर कोसळतात. यामध्ये शेतकऱ्याचे नुकसान टाळण्यासाठी पणन मंडळाच्या वतीने हि योजना राबवण्यात येत आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याने पिक नोंदणीचा ७/१२, आधार कार्ड झेरॉक्स, बँक खात्याचा तपशील व २०० रुपयाचा बँाड या कागदपत्रांची पूर्तता करावी. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, रत्नागिरी येथे श्री पांडुरंग कदम मो. ९४०३५०९६३६, अभय काकतकर मो. ९४२२३७६०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:23 PM 17-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here