वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरीच्या वतीने शृंगारतळी येथे आजपासून ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा

0

चिपळूण : वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी यांच्या वतीने दि १८ ते २० मार्च रोजी ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जिल्हाध्यक्ष विकास (अण्णा) जाधव यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

वंचित बहुजन आघाडी राजकारणासोबत समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम राबवते. युवकांना क्रीडा क्षेत्रात चालना देण्यासाठी जिल्हाध्यक्ष विकास जाधव यांनी ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.

दि १८ रोजी सकाळी ८ वाजता गोल्डन पार्क, जानवळे फाटा शृंगारतळी येथे होणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला रोख ५० हजार आणि आकर्षक चषक तर द्वितीय विजेत्याला २५ हजार रुपये व चषक देउन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय अंतिम सामन्यात 3 षटकार, 3 चौकर आणि 3 विकेट घेणारी खेळाडूला प्रत्येकी १ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

अनेक नामवंत संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वतः जिल्हाध्यक्ष विकास जाधव, जिल्हा महासचिव नितीन जाधव, तालुकाध्यक्ष ओंकार पेढामकर भूषण पवार व नामदेव धुमाळ आणि सर्व कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:42 AM 18-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here