कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा; अन्यथा आंदोलन छेडण्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा

0

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावा. अन्यथा, धरणे आंदोलन करावे लागेल, असा इशारा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाचे कुलसचिव यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे. कृषी विद्यापीठ परिनियम १९९० अन्वये नियम क्र. १३८ नुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कृषी विद्यापीठ सेवेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवेतील नियम व शर्ती जशास तशा लागू आहेत; परंतु राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळू लागले असूनही कृषी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे, कृषी विद्यापीठ सेवेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी २० मार्च रोजी कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमून काळ्या फिती लावून धरणे आंदोलन करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here